Mahabaleshwar येथे लोकांनी उभा केला ३ टन कचऱ्याचा ढीग | Lokma Latest News | Lokmat News

2021-09-13 1

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वरला लाखो पर्यटकांनी पसंती दिली. पण त्य़ानंतर महाबळेश्वरमध्ये कचऱ्याच साम्राज्य पसरलं होतं. हा संपूर्ण कचरा साफ करायला नगरपालिका कर्मचा-यांना रात्री १ ते पहाटे पाचपर्यंत मेहनत घ्यावी लागली. तब्बल ३ टन कचरा इथून काढण्यात आला. वेण्णा लेक इथे ६ अंशावर पारा घसरलेला असतानाही अशा कडाक्याच्या थंडीतही सफाई कर्मचारी काम करत होते ह्यातून त्यांनी स्वच्छतेचा संदेश ही दिला आहे. इथे आलेल्या पर्यटकांनीच जर भान राखलं असतं आणि अस्वच्छता केली नसती तर कडाक्याच्या थंडीत या कर्मचाऱ्यांनाही काम करावं लागलं नसतं. म्हणून पर्यटकांनी सुद्धा आपल्यामुळे निसर्गाची हानी आणि इतरांना त्रास होणार नाही ह्याचे भान बाळगावे.



आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires